You’re my Food, Babe….

Today’s the 10th birthday of my beloved daughter Sunskriti!  So here’s a tribute to you, Sunskriti, for being my everything that you’ve become!  Happy Birthday Pilloo!  This poem is only for you and for your amazingly weird sense of humor that’s way beyond your age!  Love.

Posted in Uncategorized | 3 Comments

… and because he was alive…

This is an English translation of my marathi poem.  I have been writing this series of poems depicting often fleeting moments in my life that have made a tremendous visual and emotional impact on me.  Very few of them have been translated into English.  This one is an exception….

This happened one morning in my childhood, when I had gone to the local railway station to drop off my grandmother….

because he was alive

 

Posted in Uncategorized | Leave a comment

क्षणचित्रे: तो जिवंत होता म्हणुनी…

लहानपणीच झालेला अजून एक आघात… माझ्या आजीला सोडायला पुणे रेल्वे स्टेशनवर गेलो होतो तेव्हाचा…

तो जिवंत होता म्हणुनी...

तो जिवंत होता म्हणुनी...

Posted in Uncategorized | 1 Comment

क्षणचित्रे: अॅरोमॅटिक

Aromatic: A Marathi Poem by Anil M. Paranjape
Posted in Uncategorized | 4 Comments

क्षणचित्रे: दामू

अगदी लहानपणीच मनावर कधी कधी असे काही आघात होतात की त्या एकेका क्षणांमधेच आपलं वय काही वर्षांनी अागे कूच करतं.  लहानपणी वाड्यात खेळताना अचानक दामूला संडासातून लोकांचं शेण खाताना पाहिलं आणि मनावर अक्षरश: मरणाचा अोरखडा पडला.  वाड्यात भंगीकाम करणार्‌या दामूकडे त्याआधी आम्ही कधी लक्षही दिलं नव्हतं.  भुकेच्या आगीमुळे वेड्या झालेल्या दामूच्या त्या कृत्यानंही झाला नाही असा आघात त्यानंतर वाड्यातल्या समस्त आयांनी त्यांच्या पोरांना, माझ्या सवंगड्यांना घरात फरपटून घेतल्यानं झाला.  भुकेनं कासावीस झालेल्या त्या जिवाला चार घास देण्याऐवजी  त्यांनी त्यांच्या मुलांच्या कोवळ्या मनांना जपणं पत्करलं.  मी तिथं जमिनीत चिणल्यासारखा खिळून उभा असतानाच माझी माता तिथे आली आणि तिनं मला केलं असतं तितक्याच प्रेमानं तिच्या वडलांच्या वयाच्या त्या वृद्धाला जेवू घातलं आणि त्यानंतरचीही सगळी जेवणं आमच्याकडेच करण्याचं बजावलं.  माझ्या मातेचा इतका अभिमान मला कधी वाटला नव्हता!

पुन्हा एकदा ह्या कवितेबरोबरचं चित्र माझंच आहे.  असल्या विषयाला अप्रोप्रिएट चित्र अजून दुसरं कसं मिळणार?

क्षणचित्रे - दामू

क्षणचित्रे - दामू

Posted in Uncategorized | 9 Comments

क्षणचित्रे: फुलारलेली

मॉडर्न कॅफेच्या चौकात सिग्नलला उभा असताना ती अचानक समोर आली.  हातात गुलाबाचे गुच्छ घेतलेली रस्त्यावरची तीनचार विसंवादी चिरगुटांत गुंडाळलेली सावळी कोवळी अप्सराच जणु.  आपल्यावर रोखलेल्या सर्व नजरांची तिला नीट जाण होती पण पर्वा नव्हती.  जवळच थांबलेल्या पोलिसी जीपमधून एकदम एकजण खाली उतरला आणि तिला हटकून तिचा हात धरून जीपमधे चल म्हणायला लागला… भर दिवसा… भर रस्त्यात!  रोज हजारो बोचर््या नजरा परतवणारी ती व्हिजिबली हलली.  वाहता रस्ता पण नि:शब्द झाला, मीही थरारलो.  आपल्या पुण्यात?  भर दिवसा?  निळ्या गाडीतून हसण्याचे आवाज आले आणि कोणीतरी त्यांच्या रस्त्यावरच्या सहकार््याला हसून म्हणाले, “ए, चल रे”.  तितक्यात हिरवा सिग्नल पडला, त्याने तिचा हात सोडला, गाडी निघाली, ट्रॅफिकही सुटलं, तीही बाजूला गेली आणि नि:शक्त पायांनी मीही अॅक्सिलरेटर दाबला…

यावेळीही कवितेबरोबरचं चित्र शेवटी मीच रंगवलं, दर वेळी कवितेला चपखल बसणारं चित्र कसं मिळणार?

क्षणचित्र - फुलारलेली

क्षणचित्र - फुलारलेली

Posted in Uncategorized | 3 Comments

क्षणचित्रे: मोर्चा

क्षणचित्र - मोर्चा

Posted in Uncategorized | 1 Comment